आईच्या कर्तुत्वात मुलाचं भाग्य दडलेलं असतं – प्रा. वैशाली पाटील
मराठा सेवा संघ प्रबोधन परिषदेतर्फे जिजाऊ जन्मोत्सव
आईच्या कर्तुत्वात मुलाचं भाग्य दडलेलं असतं – प्रा. वैशाली पाटील
मराठा सेवा संघ प्रबोधन परिषदेतर्फे जिजाऊ जन्मोत्सव
जळगाव I प्रतिनिधी
मराठा सेवा संघ प्रबोधन परिषदे तर्फे 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव यानिमित्ताने प्रोफेसर कॉलनी राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करून जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा.वैशाली पाटील यांनी प्रबोधन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वगुणसंपन्न बनवून, जागतिक अढळ स्थान प्राप्त करून देणाऱ्या तसेच शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहोचवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ. आईच्या कर्तुत्वात मुलाचं भाग्य दडलेलं असतं ते असं. जिजाऊ नी स्वराज्य हा गुरुमंत्र शिवाजी महाराजांना दिला.
जिजाऊ व शहाजीराजांचा संसार स्वराज्य निर्मितीच्या राजकारणात गुंतला गेला. जिजाऊंचे राजकारण म्हणजे स्वराज्याची निर्मिती होती. एक स्त्रीने ठरवलं तर कुटुंब काय, जग बदलू शकते याची प्रचिती म्हणजे जिजाऊ. हाच आदर्श प्रत्येक स्त्रीने घेतला तर तरुण पिढीला सकस विचार व चांगला वारसा मिळेल. म्हणूनच तर जयंती साजरी करायचा अट्टाहास असतो.
स्वराज्य निर्मितीच्या काळातील प्रश्न राष्ट्रमाता जिजाऊंनी कसे सोडवले तोच धागा पकडून आजचे समाजातील प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल यासाठी प्रत्येकाने जिजाऊ चरित्र वाचणे आवश्यक आहे. शिवरायांचं प्रखर तेजस्वी चरित्र शिल्प घडवणारे राजमातेचे हात जितके हळुवार होते. तितकेच कर्तव्य कठोरही होते.
हिरकणीचा सत्कार करण्याची प्रेरणा देणाऱ्या ही त्याच तर अफजल खानाच्या भेटीसाठी शिवबाला तयार करण्याऱ्या ही त्याच मनानं खंबीर,धाडसी व शिवबाच्या मनात आत्मविश्वास पेरणाऱ्या ही त्याच होत्या. यावेळी आदित्य पाटील याने ही प्रबोधन परिषदेमुळे मी आज शिवव्याख्याता झालो असे मत मांडले.
यावेळी पदाधिकारी अर्चना पाटील, शितल पाटील ,ज्योती पाटील, कविता फुलपगारे इ. सोबत परिसरातील कृष्णाबाई पाटील, प्रतिभा बोरसे, गौरी पिंगळे ,नंदिनी पाटील, रेवती पाटील, कविता पाटील ,आदित्य पाटील ,उमाकांत पाटील सौरभ बोरसे,भुषण पाटील,संभाजी बोरसे,निकुंज पाटील,संशित पाटील सहीत,जयहिंद ,शाहु काँलनीतील महिला उपस्थित होत्या
=========================
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम