आईला बसमध्ये बसवताना महिलेचे मंगळसूत्र चोरीला; महिलेसह दोन अल्पवयीन मुलींना अटक

बातमी शेअर करा...

आईला बसमध्ये बसवताना महिलेचे मंगळसूत्र चोरीला; महिलेसह दोन अल्पवयीन मुलींना अटक

चाळीसगाव प्रतिनिधी ;- बसमध्ये आईला बसवण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील २४ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींना चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी चाळीसगाव बस स्थानकावर घडला.

शास्त्रीनगर येथील लता रवींद्र जाधव या त्यांच्या छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या आईला भेटण्यासाठी बस स्थानकावर गेल्या होत्या. आईची भेट झाल्यावर त्यांनी त्यांना पाचोऱ्याच्या बसमध्ये बसवले. बसमधून खाली उतरत असताना त्यांच्या गळ्यातील २४ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रशांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप मोरे, पवन पाटील आणि अंजली पवार यांनी तपास सुरू केला. तपास करत असताना, कन्नड नाक्याजवळ एक वृद्ध महिला आणि तिच्यासोबत दोन अल्पवयीन मुली संशयास्पद स्थितीत पोलिसांना दिसल्या. चौकशीदरम्यान, त्यांनी गंगापूर तालुक्यातील गायरान येथील असल्याचे सांगितले.

बसमध्ये झालेल्या चोरीबद्दल विचारले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ सोन्याचे डोरले, मणी, चाकू, ब्लेड आणि सोन्याचा एक मणी असा ऐवज मिळाला. त्यानंतर पोलिसांनी त्या महिला आणि तिच्या दोन मुलींना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार प्रशांत पाटील करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम