
आईला शिवीगाळ व मारहाण केल्याचा जाब विचारल्यावरून एकावर चाकूने वा
आईला शिवीगाळ व मारहाण केल्याचा जाब विचारल्यावरून एकावर चाकूने वार
जामनेर तालुक्यातील सांगवी येथील घटना
पहुर प्रतिनिधी माझ्या आईला शिवीगाळ व मारहाण का केली असे बोलण्याचा राग आल्याने एकाने कांदा कापण्याच्या सुरीने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील सांगवी येथे 13 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सांगवी येथील रहिवासी आणि मजुरी करून उदरनिर्वाह करणारे हुसेन वजीर तडवी यांनी गावातील शरीफ सलीम तडवी याला माझ्या आईला शिवीगाळ व मारहाण का केली असे बोलण्यास गेले असता त्याने कांदा कापण्याच्या सुरीने हुसेन तडवी यांच्या कपाळावर डाव्या बाजूला चाकू मारून दुखापत केली. याप्रकरणी ओशन तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पौर पोलिस स्टेशनला शरीफ तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास राहुल पाटील करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम