आक्षेपार्ह फोटो काढण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीला अटक ; दोन दिवसांची कोठडी

बातमी शेअर करा...

आक्षेपार्ह फोटो काढण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीला अटक ; दोन दिवसांची कोठडी

जळगाव : =खोटे नाव सांगून अल्पवयीन मुलीशी मैत्री करीत तिच्यासोचत काढलेले आक्षेपार्ह फोटो काहण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच धमकी देणे सुरूच ठेवत शरीर सुखाचीही मागणी केली. या प्रकरणी आयान शेख नूर मोहम्मद (१९, रा. गेंदालाल मिल परिसर) गाला अटक करण्यात आले असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हदीतील एका अल्पवयीन मुलीला आयान शेख याने विशाल शमी असे खोटे नाव सांगून तिच्याशी मैत्री केली.

त्यानंतर तिच्यासोबत २२ डिसेंबर २०२४ रोजी आक्षेपार्ह फोटो काहले. ते फोटो व्हायरलची धमकी देत २६ मार्च रोजी पुन्हा अधील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. त्यानंतर धमकी देत शरीर सुखाची मागणी केली. अखेर या प्रकाराला कंटाळून मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आयान शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात अवली. सरकार पक्षातर्फे जिल्ह्य सरकारी वकील अँड सुख कावरा यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम