आचेगावजवळ रेल्वेच्या धडकेत तरुण ठार

बातमी शेअर करा...

आचेगावजवळ रेल्वेच्या धडकेत तरुण ठार

वरणगाव प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील आचेगाव रेल्वे स्टेशनच्या थोडच अंतरावर रेल्वे गाडीचा जबर फटका बसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दि २७ सोमवार रोजी घडली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय आहे.

सदानंद प्रकाश सुरवाडे (२४ ) रा आचेगाव असे मृत तरुणाचे नाव असून तो सोमवार दि २७ रोजी आचेगाव रेल्वे स्टेशन कडे जात असताना खांबा न ४५२ / १० ते ४५२ / १६ या दरम्यान कोणत्या तरी रेल्वे गाडीचा त्याच्या डोक्याला जबर फटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला श्रीमती श्रद्धा सोनी उप स्टेशन प्रबंधक यांच्या खबरी वरून घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो हे कॉ सुधाकर शिंदे हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम