आजारपणाला कंटाळून वृद्धाने उचलले टोकाचे पाऊल
आजारपणाला कंटाळून वृद्धाने उचलले टोकाचे पाऊल
जळगाव │ शहरातील तेली चौक परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (३० नोव्हेंबर) सायंकाळी घडली. या प्रकरणी रात्री ९ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताचे नाव अशोक कडू चौधरी (वय ६५, रा. तेली चौक) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी हे काही महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. आरोग्य बिघडल्याने ते सतत तणावात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. रविवारी सायंकाळी घरात कुणी नसताना त्यांनी फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
घटना लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
शनीपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ भागवत शिंदे करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम