आजी, माजी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी ‘सैनिक सेवा दिवसाचे’ आयोजन

बातमी शेअर करा...

आजी, माजी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी ‘सैनिक सेवा दिवसाचे’ आयोजन

जळगावः जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी व समस्या ऐकून घेण्यासाठी १३ मे रोजी सकाळी १० वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘सैनिक सेवा दिवसाचे’ आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उपक्रमात वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिकांच्या विधवा, पाल्य तसेच कर्तव्यावर असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सहभागी होता येणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ‘सैनिकहो तुम्ही देशाचे संरक्षण करा, आम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ’ या आवाहनानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या दिवशी उपस्थित कुटुंबीयांच्या अडचणी थेट प्रशासनाकडे मांडता येणार असून, त्यासाठी तीन प्रतींमध्ये स्पष्ट माहिती आणि अडचणी नमूद केलेला अर्ज सादर करावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम