
आणीबाणी काळातील मानधनासाठी अर्ज करण्यास 24 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
आणीबाणी काळातील मानधनासाठी अर्ज करण्यास 24 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
जळगाव (प्रतिनिधी) : देशात सन 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. या काळात सामाजिक व राजनैतिक कारणांसाठी लढा देतांना कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान म्हणून शासनाकडून मानधन देण्याची योजना 3 जुलै 2018 रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे.
28 जुलै 2022 नुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली होती. मात्र शासन निर्णय नुसार 26 ऑगस्ट 2025 अन्वये या मुदतीत शिथिलता देत नव्याने अर्ज सादर करण्याची नवी अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेले लाभार्थी अथवा त्यांच्या पश्चात हयात जोडीदार (पती/पत्नी) ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनीच विहित नमुन्यातील अर्ज व शपथपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम