आत्मविश्वास निर्माण करा व कौशल्य आत्मसात करा – प्रा.व.पु होले

दहावीतील विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ

बातमी शेअर करा...

आत्मविश्वास निर्माण करा व कौशल्य आत्मसात करा – प्रा.व.पु होले
दहावीतील विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ
जळगाव प्रतिनिधी

.खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आलासदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मा.प्रा.व.पु.होले (सचिव ,लेवा एज्युकेशन सोसायटी जळगाव) व श्री.वाय एम बोरोले , गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयायाच्या मुख्याध्यापिका सौ.धनश्री फालक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे ,पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे व्यासपीठावर उपस्थित होते. ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आदर्श विद्यार्थ्यी दामोदर धनंजय चौधरी व आदर्श विद्यार्थ्यींनी सृष्टी विशाल कुलकर्णी ,आदित्य विसपुते ,तनुश्री सोनार या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात पदार्पण केल्यापासून ते शालेय जीवनातील अंतिम टप्प्यातील प्रवास करीत असतानाच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळा व शिक्षक यांचे जिव्हाळ्याचे नाते आयुष्यभर जपत राहणार व शालेय जीवनातील शीस्त व संस्कार अंगिकारुन समाजातील जबाबदार नागरिक बनणार असे आश्वासित केले.

शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.एकनाथ पाचपांडे यांनी स्वलिखीत कविता सादर करून शिक्षकांच्या व पालकांच्या भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडल्या.ज्येष्ठ शिक्षिका सौ.पुनम कोल्हे यांनी परिश्रम घ्या व प्रामाणिक प्रयत्न करा यश नक्कीच मिळेल विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे यांनी विद्यार्थ्यांना आहार ,व्यायाम, व ध्यानधारणा करा व ताणतणावमुक्त रहा व परिक्षेस सामोरे जाऊन यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.शाळेतील
शिक्षक श्री.महेंद्र नेमाडे ,श्री.निर्मल चतुर सर, यांनी रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव व व.वा.वाचनालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत प्राविण्य मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुखपाहुणे प्रा.व.पु.होले सर यांनी
शालेय विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेच्या युगात आपले स्थान कुठे आहे हे ओळखून आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने कौशल्य आत्मसात करून आपले मुल्य ठरवावे.तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार येणाऱ्या काळाची गरज ओळखून ज्ञान प्राप्त करा. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सूत्र संचालन श्री.चंद्रकांत कोळी सर यांनी केले.तफ तर आभारप्रदर्शन सौ.प्रतिभा लोहार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम