आत्मविश्वास हाच यशाचा मूलमंत्र- प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर

बातमी शेअर करा...

आत्मविश्वास हाच यशाचा मूलमंत्र- प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर

गो. से. महाविद्यालयात दीक्षारंभ सप्ताहाची यशस्वी सांगता

खामगांव (प्रतिनिधी) स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विज्ञान व कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 8 जुलै ते 11 जुलै 2025 या दरम्यान दीक्षारंभ हा उपक्रम सेंटर ऑफ एक्सलन्स हॉल येथे घेण्यात आला. या समारोपिये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर व प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ. प्रफुल उबाळे लाभले होते. मंचावर संयोजक प्रा. डॉ. जयंत पोरे, सायन्स विभागाच्या समन्वयक प्रा. डॉ. अशोक पडघन, कला विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉ. एस. टी. वराडे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सुनील मुळे उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. प्रफुल उबाळे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले दीक्षारंभ कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधताना अत्यंत आनंदी आहे. जीवनातील हा नवीन टप्पा महाविद्यालयीन जीवन हे केवळ पुस्तकी शिक्षणाचे नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासाचे, नवदृष्टी मिळवण्याचे, आणि स्वतःला शोधण्याचे स्थान आहे. आपल्यासाठी महाविद्यालयाने आधुनिक सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, तंत्रस्नेही प्रयोगशाळा, आणि मार्गदर्शक शिक्षकांचा भरवशाचा हात दिला आहे. पण या सर्वांचा उपयोग करून घेणे ही जबाबदारी तुमची आहे. स्वप्नं मोठी बाळगा, अपयशाला घाबरू नका, आणि शिकण्याची भूक कधीही मरू देऊ नका. कारण ज्ञान हीच खरी ताकद आहे, आणि तीच तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाले आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्याचा मूलमंत्र मुळीच गोपनीय नाही. मात्र तो गोपनीय नसल्यामुळेच आपल्या लक्षात येत नाही. बर्‍याचदा असे होते की, सोपी गोष्ट तिच्या सोपेपणामुळे आपल्या लक्षात येत नाही. मानवाची यशस्वी होण्याची भूक अनंत आहे. यशाची व्याख्या काय, इथपासून ते यशस्वी झाल्यानंतर पुढे काय इथपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरं आपण सतत शोधत असतो. डिग्री प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची ही सुरुवात असून, उच्च शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी दिशादर्शक हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना ओळखून, व क्षमतांचा वापर करून जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा. महाविद्यालयातील सोयी-सुविधांचा आपल्या प्रगतीसाठी मोलाचा वाटा असतो. महाविद्यालयातील ग्रंथालय, इंटरनेट सुविधा, क्रीडांगण, लेबोरेटरीज तसेच प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विषय समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न हेच तुम्हाला चांगली पदवी मिळवून देऊ शकते. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात गेल्यास नियोजन पूर्ण काम केल्यास आपल्या ला यश निश्चितच मिळते. ध्येय ठरवून प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हा यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे. विविध वक्त्यांनी विविध विषयाच्या अनुषंगाने जे विचार विद्यार्थ्यां पुढे मांडले त्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर निश्चितच चांगला परिणाम होईल. उद्याचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल असा मला विश्वास वाटतो. स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम  हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी  दिशादर्शक उपक्रम आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. अशोक पडघन यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम