
आदर्श नगरात तरुणाला बेदम मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा
आदर्श नगरात तरुणाला बेदम मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा
जळगाव प्रतिनिधी शहरातील आदर्श नगर येथे बुधवारी (३ सप्टेंबर) सायंकाळी एका तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेर सलीम पटेल (वय २५, रा. रजा कॉलनी) हा तरुण ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आदर्श नगरातील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर उभा होता. त्याचवेळी तोंडाला रुमाल बांधलेले चार अनोळखी व्यक्ती तेथे आले. त्यांनी कोणत्याही कारण नसताना उमेरला शिवीगाळ करत लोखंडी पाईपने त्याच्या पायावर आणि डोक्यावर मारहाण केली. या हल्ल्यात उमेर गंभीर जखमी झाला.
हल्ला केल्यानंतर आरोपी लगेच पसार झाले. या घटनेनंतर उमेरने रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम