आदिवासी कोळी जमातीच्या महाआंदोलनास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद

२३ जानेवारी पासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर "राज्यव्यापी महाआंदोलन"

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि १६ जानेवारी २०२४

आदिवासी कोळी जमातीच्या महाआंदोलनास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद

चोपडा – सन १९७६ पासून कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी या अनुसूचित जमातींना अनुसूचित जाती व जमाती आदेश सुधारित कायदा, १९७६ या कायद्यानुसार संविधानिक “अधिकार हक्कं व लाभ” मिळत नसल्यामुळे

आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक अॕड्व्होकेट शरदचंद्र जाधव (पुणे), प्रभारी अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे (संभाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाने

आदिवासी

अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (जळगाव) यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. २३ जानेवारी २०२४ पासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर “राज्यव्यापी महाआंदोलन” उभारण्यात येत आहे.

त्यासाठीच्या नियोजन सभा, बैठका प्रत्येक जिल्हावार सुरू असून, ह्या राज्यव्यापी महाआंदोलनास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद व जाहिर पाठिंबा मिळत आहे.

जिल्हावार प्रमुख आंदोलक व उपोषणकर्त्यांची नावे पुढीलप्रमाणे – क्रांतिकारी प्रवचनकार भरत महाराज सपकाळे, रणरागिणी ग्रुपच्या मंगलाताई सोनवणे (जळगाव), हिराभाऊ वाकडे,

महेश सावळे (धुळे), भास्कर कुंवर, डॉ. राजेंद्र सावळे, सौ. इंदुताई सोनीस (नंदुरबार), बाळासाहेब शेवरे, धीरज मोरे (नाशिक), अर्जुनराव सरपते, गोरख चारणे (अहमदनगर), सौ.अनिताताई मुदीराज, आनंदा इंगळे (संभाजीनगर), सुभाष पाडळे, महादेव गायकवाड (जालना), कल्याण शिरसागर, दादासाहेब कांबळे (बीड),

दयाराम इटुबोणे, सुमन कोळी (लातुर), आनंदा रेजितवाड, केरबा जेटेवाड (नांदेड), माधव सुरवसे (परभणी), संभाजीराव मोरे, (हिंगोली), श्रीराम अकोसकर, सुभाष कांबळे (उस्मानाबाद), गोरक्षनाथ कोळी, रघुनाथ कोळी (मुंबई), हेमंत कोळी (मुंबई उपनगर),

दिपाली कोळी, रवी कोळी (ठाणे), जयवंत पोकळे (रायगड), महेंद्र चोगले, गणेश चोगले (पालघर), किसन ठोंबरे (पुणे), सुरेश गायकवाड (सातारा), सिताराम चन्नाप्पा (सोलापूर), अण्णासाहेब शिरगावे (कोल्हापूर), एकनाथ सूर्यवंशी (सांगली),

सौ. पुष्पाताई कोळी (बुलढाणा), जनक मानकरी, गजानन लोखंडे (वाशिम), ज्ञानोबा येंचेवाड, गणपतराव येंचेवाड (चंद्रपूर), विनायक सोळुंके (यवतमाळ) यांचेसह आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे सदस्य व

त्या त्या जिल्ह्यातील सर्व लहानमोठ्या कोळी समाज संस्था, मंडळे, संघटनांचे नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी अधिकारी, कर्मचारी, समाजबांधव, माताभगिनीं, आबालवृद्ध विशेष करून सहभागी होणार आहेत.

हे वाचा👇

चोपडा महाविद्यालयास कबचौ उमवि एकांकिका करंडक स्पर्धेत हॅट्रिक प्राप्त विजेत्यांचा झाला सत्कार

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम