आदिवासी भागातील जवळपास १२०० विद्यार्थ्यांनी मोबाईल सायन्स व्हॅनचा घेतला लाभ

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आयोजन

बातमी शेअर करा...

आदिवासी भागातील जवळपास १२०० विद्यार्थ्यांनी मोबाईल सायन्स व्हॅनचा घेतला लाभ
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आयोजन
जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी भागातील जवळपास १२०० विद्यार्थ्यांनी मोबाईल सायन्स व्हॅनचा लाभ घेतला.

दि. २७ फेब्रुवारी रोजी धुळे जिल्हयातील शेवंती प्रा. शाळा आणि कृष्णा हायस्कूल, मोराणे येथे विद्यार्थ्यांना या फिरती विज्ञान प्रयोगशाळेचे प्रदर्शन दाखविण्यात आले. तसेच दि. २८ फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथील अनुदानित माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा, कोलदे, अनु. माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा, लोय तसेच शासकीय माध्यमिक व उच्च माध्य. आश्रमशाळा, कोठली. तसेच या मोबाईल सायन्स व्हनचा जवळपास१२०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

या उपक्रमात जळखे येथील प्रवीण सोनवणे यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनात मदत केली. हा शैक्षणिक उपक्रम प्रा.संजय घोष आणि त्यांचे सहकारी राहुल हजारी, कार्तिक शेळके, नरेंद्र ठाकूर, मयूर बंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. तसेच वाहन चालक मन्साराम राठोड यांनी या उपक्रमात सहकार्य केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम