‘आदिवासी समुदायाच्या संशोधन पद्धती आणि तंत्रज्ञान’ या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संशोधन आणि सादरीकरण

बातमी शेअर करा...

‘आदिवासी समुदायाच्या संशोधन पद्धती आणि तंत्रज्ञान’ या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संशोधन आणि सादरीकरण

जळगाव, (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘आदिवासी समुदायाच्या संशोधन पद्धती आणि तंत्रज्ञान’ या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप आज संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ, महू (म. प्र.) चे कुलगुरू प्रा. रामदास आत्राम आणि व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारोप झाला.

यावेळी मंचावर आदिवासी अकादमीचे संचालक प्रा. के. एफ. पवार आणि अधिसभा सदस्य डॉ. विशाल पराते उपस्थित होते. प्रा. आत्राम यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या आदिवासी संशोधन क्षेत्रातील पुढाकाराचे कौतुक करत आदिवासी अकादमीच्या कार्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्यांनी या चर्चासत्रामुळे आदिवासी समुदायाच्या उन्नतीस सहकार्य मिळणार असल्याचे सांगितले.

व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ घेत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली आणि त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सुरू असलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकला.

चर्चासत्राच्या सकाळ सत्रात विविध तज्ज्ञांनी ‘आदिवासी पर्यावरण संवर्धन’, ‘शाश्वत विकासातील पारंपरिक ज्ञान’, ‘आदिवासींच्या विकासासाठी तंत्रज्ञानातील नवकल्पना’ आणि ‘संस्कृतीचे पुनरुज्जीवन’ या विषयांवर आपली मते मांडली.

या चर्चासत्रासाठी २२५ संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४० संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.

या चर्चासत्राच्या आयोजनासाठी डॉ. आर. एस. सिरसम, डॉ. मनोज पाटील, डॉ. अमरदीप पाटील, डॉ. राजीव आमले आणि हर्षल चौरे यांनी विशेष परिश्रम घेतले. गणितशास्त्र प्रशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही मोलाचे योगदान दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम