आदिवासी समुदायाच्या विकासाठी कार्यक्रम या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा
विद्यापीठात आयोजन
आदिवासी समुदायाच्या विकासाठी कार्यक्रम या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा
विद्यापीठात आयोजन
जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण व भुशास्त्र प्रशाळेत पीएम-उषा अंतर्गत आदिवासी समुदायाच्या विकासाठी कार्यक्रम या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांनी केले. संचालक प्रा.एस.एन.पाटील अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाने आदिवासी समुदायासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती प्रा. इंगळे यांनी दिली. प्रा. एस.एन पाटील यांनी आदिवासी भागामध्ये झालेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. डॉ. रमजान तडवी, प्रा.भुषण चौधरी, डॉ. नरसिंह परदेशी, डॉ. महेंद्र महाजन यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. ११९ विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. डॉ. वाय. जे. महाजन यांनी प्रास्तावीक केले. मयुरी पाटील व श्रध्दा भदाणे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. व्ही.एम.रोकडे यांनी आभार मानले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम