आदिशक्ती विशेष इनक्युबेशन कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे अनावरण

बातमी शेअर करा...

आदिशक्ती विशेष इनक्युबेशन कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे अनावरण

जळगाव, दि. २८ ऑक्टोबरः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत केबीसीएनएमयू सेंटर फॉर इमोशन इन्क्युबेशन अँण्ड लिंकेजेस (KCIIL) आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, मुंबई पुरस्कृत सिलेज आधारित क्षेत्र विकास कार्यक्रम (सीएडीपी), नंदुरबार याच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी युवक-युवतींसाठी राबविण्यात येत असलेल्या आदिशक्ती या विशेष इनक्युबेशन कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे अनावरण आज कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना कुलगुरू यांनी या उपक्रमाचे कौतुक केले ते म्‍हणाले, “आपल्या भागातील आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि नवनवीन कल्पना आहेत, ‘आदिशक्ती’ उपक्रमाच्या माध्यमातून या युवकांना उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा KCIIL व  CADF यांचा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. या उपक्रमामुळे एक नवी उद्योजक पिढी घडेल आणि विद्यापीठ या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करेल.”

सिलेज आधारित क्षेत्र विकास प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक प्रा. के. एस. विश्वकर्मा यांनी मत मांडले की, “हा कार्यक्रम आदिवासी युवक-युवतींसाठी एक नवीन मंच उपलब्ध करून देईल व त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना उद्योगभिमुख बनविण्याचा महत्त्वाकांक्षी ठरेल.”

KCIIL चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नविन खंडारे यांनी ‘आदिशक्ती’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आदिवासी भागातील नवकल्पनांना (Innovations) शोधून त्यांना इनक्युबेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करून एक यशस्वी स्टार्टअप म्‍हणून उभे करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माहितीपत्रकाद्वारे आम्‍ही जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचू शकतो.”

याप्रसंगी KCIIL संचालक मंडळ सदस्य डॉ. राजेश जावळेकर, डॉ. आशुतोष पाटील, डॉ. अरुण इंगळे, सीए रवींद्र पाटील, सीएडीपी प्रकल्पाचे सह-प्रमुख अन्वेषक डॉ. जे. पी. बंगे तसेच केसीआयआयएलचे पोर्टफोलिओ व्यवस्थापक  योगेश पाटील, कार्यक्रम समन्वयक रोशनी जैन व इतर कर्मचारी उपस्थित होते, या माहितीपत्रकाद्वारे ‘आदिशक्ती’ उपक्रमाची सविस्तर माहिती आदिवासी युवकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम