आनंद घरातील विद्यार्थ्यांनी केले विवेकानंदांच्या पुस्तकांचे वाचन

बातमी शेअर करा...

आनंद घरातील विद्यार्थ्यांनी केले विवेकानंदांच्या पुस्तकांचे वाचन

पाचव्या रोटरी वाचन कट्ट्याचे आयोजन

जळगाव – रोटरी क्लब जळगाव आणि व.वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यामाने मेहरूण येथील आनंदघर येथे आयोजित पाचव्या रोटरी वाचन कट्ट्यात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याविषयीच्या पुस्तकातील काही भागांचे दहा विद्यार्थ्यांनी वाचन केले.

प्रारंभी संकोच करणारी, आम्ही नाही वाचणार असे म्हणणारी मुले या वातावरणात रमून पुढे आले व आत्मविश्वासाने वाचन करीत या उपक्रमात सहभागी झाले. रोटरीच्या बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी या फोकस एरियाशी तसेच लिटरसी मंथ निमित्ताने सेवा वस्तीतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी वाढावी म्हणून आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी वाचनालयाच्या मानद सचिव प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, रोटरी क्लबचे मानद सचिव सुभाष अमळनेरकर, सुबोध सराफ, ॲड. हेमंत भंगाळे, स्वाती ढाके, हर्षदा भंगाळे, वर्धिष्णू संस्थेचे प्रणाली सिसोदिया, रितिका देवते आणि आशिष गजभार यांनीही वाचनात सहभाग घेतला.

औपचारितेच्या चौकटीत न ठेवता पूर्णपणे मोकळ्या वातावरणात झालेल्या या पाचव्या रोटरी वाचन कट्ट्यात आनंदघरचे प्रतीक्षा बोरसे, मोक्षदा पाटील, रोशनी वेरुळकर, अश्विनी हटकर, गणेश वेरूळकर, दानिश पटेल, मानसी वेरूळकर, समाधान बोरसे, सपना या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम