आपणच आपल्या आराध्य देवताची विटंबना थांबवू शकतो -उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर

बातमी शेअर करा...

आपणच आपल्या आराध्य देवताची विटंबना थांबवू शकतो – उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर

सावदा/प्रतिनिधी
आपणच आपल्या आराध्य देवता असलेल्या श्री गणेश यांची विटबांना थांबवू शकतो. नकळतं आपल्या कडून गणेशाची विटबांना होत असते,गणेश उत्सव हा आपला धार्मिक उत्सव आहे हा उत्सव सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा, आपल्या आया बहिणी यांना आपल्या उत्सव मिरवाणुकीत सहभागी होता आले पाहिजे त्यांना कां सहभागी होता येत नही याचा विचार आपण केला पाहिजे असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांनी व्यक्त केले.
ते श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद निमित्त शांतता समिती व श्री गणेश मंडळ पदाधिकारी आयोजित बैठकित बोलत होते.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारीभाग फैजपूर अतिरिक्त पदभार मुक्ताईनगर अनिल बडगुजर, नायब तहसीलदार आर डी पाटील, म. रा.वि. वि. कं.कार्यकारी अभियंता गणेश महाजन, सावदा नपा मुख्याधिकारी भूषण वर्मा, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता बाविस्कर, राजेंद्र चौधरी,सहा. पो. नि. विशाल पाटील,पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, राहुल सानप पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील, सरपंच,गणेश मंडळ पदाधिकारी , मज्जीद ट्रस्ट मुतवअल्ली यांच्या सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.प्रास्ताविक सहा. पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले, संजय महाजन (सर) यांनी सूत्रसंचालन केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी मानले.

पुढे बोलतांना गणेश मंडळाच्या कार्यकर्ते यांना त्यांनी सूचना दिल्या, पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा 75 देसीबल आवाज असणाऱ्या मंडळावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांचा सहभाग मिरवणुकीत घ्यावा, ज्या मंडळाकडून लवकरात लवकर मिरवणूक आटोपली जाईल त्या मंडळाचा सत्कार करण्यात यावा,गणेश मूर्ती उंची मर्यादित ठेवावी अशा सूचना दक्षता समितीचे सदस्या डॉ प्रियदर्शनी सरोदे, नंदाबाई लोखंडे,सिमरन वानखेडे यांनी मांडल्या, तर चिनवाल ग्रामपंचायत याचे कडून गुलाल कमी उदळणे, मिरवणुकीत मद्यपान न करणाऱ्या मंडळाचा सत्कार करण्यात येईल असे ग्रामपंचायत कडून सांगण्यात आले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम