आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न

बातमी शेअर करा...

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न

जळगाव, प्रतिनिधी:
जळगाव जिल्ह्यातील नागरिक वैयक्तिक कामे, देवदर्शन, पर्यटन, नोकरी वा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर तसेच देशाबाहेर प्रवास करतात. अशा प्रवासादरम्यान अपघात, पूर, भूकंप, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी हल्ले, अन्य अप्रिय घटनांमध्ये अडकण्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची व प्रभावी मदत मिळावी, या उद्देशाने जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी (JPSR)’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय संबधित यंत्रनांची समन्वय बैठक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

विविध आपत्ती जसे की पूर, अपघात, भूकंप, वादळ, युद्ध, दरड कोसळने इत्यादी आपत्ती ग्रस्त ठिकाणी नागरिक अडकलेले असतात. अशा वेळेस अशा अपघातग्रस्त नागरिकांचा शोध घेणे त्यांची आपत्तीग्रस्त भागातील स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तात्पुरती निवास व्यवस्था, जखमी व गंभीर जखमी नागरिकांना उपचार सुविधा, ठिकाणावरून नागरिकांना सुरक्षितरीत्या रेल्वे विमान तसेच इतर वाहनांच्या माध्यमातून जिल्ह्यात परत आणणे जखमी व मृत लोकांना उपचाररानंतर जिल्ह्यात परत आणण्यासाठी अशा पर्यटक, भाविक, विद्यार्थी यांची नोंदणी होणे आवश्यक आहे, त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पर्यटक, भावीक, प्रवासी यांनी जिल्ह्याबाहेर जाताना आपली नाव नोंदणी करूनच प्रवासात जावे जेणेकरून जिल्हा प्रशासनाला तात्काळ प्रतिसाद मदत कार्य करणे सोपे जाईल व अशा आपदग्रस्त नागरिकांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणे. हा ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी’ प्रकल्पचा उद्देश आहे.

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रणाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत सुरू करण्यात येणार आहे, यासाठी संबंधित विभागांचे नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

बैठकीत प्रवाशांची नोंदणी, माहिती अद्ययावत ठेवणे, आपत्तीच्या वेळी त्वरित संपर्क व मदत व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या प्रकल्पाची व्यापक अंमलबजावणी व जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी श्री.घुगे यांनी दिले.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, जळगाव विमानतळाचे विमानपत्तन संचालक हर्ष त्रिपाठी यांच्यासह पोलिस, आरोग्य, परिवहन, एस.टी.महामंडळ, रेल्वे विभागाचे अधिकारी, खाजगी प्रवासी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम