
आमच्या शाळेला मदत करू 37 वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांचा प्रण
आमच्या शाळेला मदत करू 37 वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांचा प्रण
जळगाव दि 29 – ला.ना सार्वजनिक हायस्कूल 1988 साली 10 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 37 वर्षानंतर एकत्र येत शाळेच्या विकासासाठी मदतीचा प्रण केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की 1988 साली ला हायस्कूल मध्ये शिकत असलेल्या 50 विद्यार्थ्यांनी आज शाळेत भेट दिली. गंमत म्हणजे आजच 78 च्या बॅचने उभारलेल्या कूपनलिका समर्पण सोहळा देखील आयोजित केलेला होता. यातूनच प्रेरणा घेत 88 बॅचने देखील शाळेच्या सर्वागीण विकासासाठी योगदान देण्याचा प्रण केला आहे.आज प्रारंभीच शाळेच्या पटांगणात हे सर्व विद्यार्थी अचानक एकत्र आले.शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे,क्रिडा शिक्षक जगताप आणि सोमनाथ महाजना यानी सर्वांचे स्वागत केले. या नंतर जगताप सरांसोबत सर्व मित्रानी शाळेची पाहणी केली. 10 वी क या वर्गात बसुन 37 वर्षानंतर शाळेचा वर्ग सुरू झाला.क्रीडा शिक्षक जगताप यानी शाळेची स्थापना ते प्रगतीचा आलेख विषाद करताना क्रिडा प्रकारात आजी माजी विद्यार्थ्यांनी कशी भरारी घेतली या बाबत माहिती दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ओळख परिचय करून देण्यात आला. मुख्याध्यापक सचिन देशपांडे यानी शाळेच्या विकासात व्यवस्थापन समितीचे अचूक निर्णय व माजी विद्यार्थ्यांनी मोलाचा हातभार असल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले.समारोप स्व किशोर कुमार यांच्या दिये जलते है या प्रभाकर जाधव यानी गायलेल्या गीताने झाला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार जवळ ग्रुप फोटो काढण्यात आला. 37 वर्षांनी कसे आले एकत्र हे मित्र
गोदावरी फाऊंडेशनचे जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यानी 4 वर्षापूर्वी सर्व मित्राना एकत्र बांधण्याचा विचार केला.7/8 मित्र खूप प्रयत्न करीत होते.शेवटी शाळेतील शिक्षक सोमनाथ महाजन यानी मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांचे सोबत चर्चा करून त्या बॅचच्या विद्यार्थी हजेरी पट उपलब्ध करून दिला मग सोशल मीडिया माध्यमातुन जवळपास 290 पैकी 155 विद्यार्थी एकत्र बांधण्यास यश आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम