आमदार किशोर पाटील यांची ओबीसी कल्याण समितीवर निवड

गुढे-वडजीत जिल्हा परिषद गटात जल्लोष

बातमी शेअर करा...

आमदार किशोर पाटील यांची ओबीसी कल्याण समितीवर निवड

गुढे-वडजीत जिल्हा परिषद गटात जल्लोष

भडगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२४-२५ सत्रासाठी विविध समित्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) कल्याण समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती राज्य शासनाच्या महत्त्वाच्या समित्यांपैकी एक मानली जाते.

या निवडीमुळे भडगाव तालुक्यातील गुढे-वडजी जिल्हा परिषद गटात आनंद आणि जल्लोषाचे वातावरण असून, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

या गटातून माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती विकास पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पी. ए. पाटील, देखरेख संघाचे माजी चेअरमन संजय पाटील, युवा उद्योजक प्रविण महाजन (कोळगाव), माजी लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील, चाळीसगाव तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. योगेश भोकरे, सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विठ्ठल माळी, भडगाव शेतकरी संघाचे संचालक गोविंद एकनाथ महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास महाजन (गुढे), अनिल बिहार्डे आदींनी आमदार पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शिवसेना, युवासेना, महिला सेना तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनीही फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप करून या निवडीचा आनंद साजरा केला. आमदार किशोर पाटील यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम