
आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक
आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक
खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्याने आंदोलन
खामखेडा (प्रतिनिधी) │ इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामात खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्याने सुरु असलेले आंदोलन चिघळले असून, आज या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
खामखेडा येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, महामार्गाच्या भूमी अधिग्रहणात अन्यायकारक मोबदला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने दादागिरी करत शेतकऱ्यांच्या केळीच्या शेतीमध्ये जेसीबी घालून पिकांची नासधूस करत काम सुरु केले होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन छेडले होते. त्यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात झटापटही झाली होती.
आजही आंदोलन सुरु असताना आमदार चंद्रकांत पाटील हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार चंद्रकांत पाटील यांना शेतकऱ्यांसह ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना पुढील कार्यवाहीसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम