
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश (पहा व्हिदिओ )
मोहरद येथे ६९ लाखांची नवीन पेयजल योजना मंजूर
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश (पहा व्हिदिओ )
मोहरद येथे ६९ लाखांची नवीन पेयजल योजना मंजूर
चोपडा:प्रतिनिधि
तालुक्यातील मोहरद गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून ६९ लाख रुपयांची पेयजल योजना मंजूर झाली आहे. या योजनेअंतर्गत १ लाख १० हजार लिटर क्षमतेच्या जलसाठ्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या योजनेमुळे गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी समस्या सुटणार आहे.
गेल्या दोन वर्षांत मोहरदसाठी विकासकामे:
या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मोहरद गावात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. गावात काँक्रिटीकरण, फेवर ब्लॉक बसविणे, उर्दू शाळा उभारणी, धानोरा ते मोहरद आणि मोहरद ते चांदणे तलाव डांबरीकरण, तसेच साठवण तलाव पाणशेवडी पेयजल प्रकल्प अशा विविध कामांना मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
भूमिपूजन प्रसंगी उपस्थित: मान्यवर
या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच पती रमजान हाजी तडवी, उपसरपंच हबीब तडवी, माजी सभापती माणिकचंद बापू, चंद्रशेखर सर, धानोरा-देवगाव येथील सरपंच, नायगाव सरपंच सरफराज तडवी, इंजिनीअर मोरे साहेब, जितू कोळी (धानोरा), प्रमोद बाविस्कर (पुंनगाव), परविन भाऊ पंचक, मन्सूर तडवी, पत्रकार शरीफ तडवी, युसूफ तडवी, अय्युब तडवी, मुबारक तडवी, फरीद तडवी तसेच मोहरद गावातील शिवसैनिक, ग्रामस्थ व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गावासाठी मोठा विकासाचा टप्पा
या पेयजल योजनेमुळे मोहरद गावातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध होणार असून हा गावाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम