
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीअंतर्गत विरावली येथे रस्ता काँक्रेटला सुरुवात
नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्याचा लाभ मिळणार
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीअंतर्गत विरावली येथे रस्ता काँक्रेटला सुरुवात
नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्याचा लाभ मिळणार
यावल प्रतिनिधी
यावल तालुक्यातील विरावली गावात आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या आमदार निधीतून वार्ड क्रमांक तीनमध्ये रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरुवात करण्यात आली. गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या कामामुळे नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्याचा लाभ मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी गावाचे माजी सरपंच तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुन्ना पाटील, विद्यमान उपसरपंच विश्वनाथ धोंडू सिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य नथू अडकमोल तडवी, सरपंच कलीमा तडवी, ग्रामपंचायत सदस्य शोभाबाई युवराज पाटील, हमीदा तडवी, इब्राहिम तडवी आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी आमदारांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व हा विकास पुढेही असाच चालू राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम