
आमदार प्रा. सोनवणे यांच्या पुढाकाराने तापी नदीवरील पुलाचे कठडे दुरुस्त
आमदार प्रा. सोनवणे यांच्या पुढाकाराने तापी नदीवरील पुलाचे कठडे दुरुस्त
चोपडा प्रतिनिधी ;- यावल तालुक्यातील कोळन्हावी गावाजवळ तापी नदीवरील विदगाव पुलावर काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातामुळे पुलाच्या कठड्याचे मोठे नुकसान झाले होते. भविष्यात अशा अपघातांना आळा घालण्यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी तात्काळ पाहणी करून उपविभागीय अभियंता जे.एस. तडवी यांना दुरुस्तीच्या सूचना दिल्या. त्यानुसार, अभियंत्यांनी त्वरित कारवाई करत कठड्याची दुरुस्ती पूर्ण केली.
या दुरुस्तीमुळे अपघातांचा धोका कमी होऊन जीवितहानी टळण्यास मदत होईल. स्थानिक नागरिकांनी आमदार सोनवणे यांच्या या कार्याचे कौतुक करत आभार मानले आहेत. कोळन्हावी गावचे सरपंच विकास कोळी (गोटू भाऊ) यांनी ही माहिती दिली .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम