आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
रत्नावती नदीवर घाट बांधण्यासह चोपड्यातील मार्केट विकासाकरिता निधीची मागणी
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
रत्नावती नदीवर घाट बांधण्यासह चोपड्यातील मार्केट विकासाकरिता निधीची मागणी
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित प्रधान सचिव यांना तात्काळ प्रस्ताव सादर करणेबाबत दिले निर्देश
मुंबई । प्रतिनिधी
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दि. ८ जानेवारी रोजी मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रत्नावती नदीवर घाट बांधण्यासह सुशोभीकरण करण्यासाठी ८० कोटी तर भाजीपाला,
मटण चिकन मार्केट विकसित करण्याकरिता ८ कोटी निधीची मागणी केली. हि कामे होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
चोपडा नगरपरिषद हद्दीतुन वाहणाऱ्या रत्नावती नदीवर मोठा नदी घाट बांधणे व सुशोभीकरण करणेसाठी राज्यस्तर नगरोत्थान योजनेतून (८०.०० कोटी रू) निधीची मागणी केली.
तसेच चोपडा शहरात भाजीपाला व फळमार्केट विकसीत करण्यासाठी (९.०० कोटी रुपये) व मटण व चिकन मार्केट विकसित करण्यासाठी (८.०० कोटी रुपये) निधीची मागणी
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ८ जानेवारी रोजी केली.
यावर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित प्रधान सचिव यांना तात्काळ प्रस्ताव सादर करणेबाबत निर्देश दिले.
हे ही वाचा👇
लासूर येथे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा नागरी सत्कार सोहळा
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम