आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाची सुरुवात
चोपडा तालुक्यासाठी एकूण 42 हजार 770 एवढ्या आनंदाचा शिधा मंजूर
आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाची सुरुवात
चोपडा तालुक्यासाठी एकूण 42 हजार 770 एवढ्या आनंदाचा शिधा मंजूर
चोपडा l प्रतिनिधी
येथील विधानसभेच्या सदस्या आ.सौ.लताताई सोनवणे तसेच चोपडा तालुक्याचे विकास पुरुष प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते
चोपडा तालुक्यासाठी पुरवठा विभागाचे आनंदाचा शिधा वितरणाबाबत शासकीय विश्रामगृह चोपडा येथे शुक्रवार दि. 11 रोजी दुपारी तीन वाजता उद्घाटन करण्यात आले. चोपडा तालुक्यासाठी एकूण 42 हजार 770 एवढ्या आनंदाचा शिधा मंजूर
उद्घाटन प्रसंगी चोपडा तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, विकास पाटील, माजी नगराध्यक्ष चोपडा, नरेंद्र पाटील सभापती, प्रकाश राजपूत माजी नगरसेवक, गटविकास अधिकारी चोपडा,
एम व्ही पाटील पंचायत समिती माजी सभापती चोपडा, श्रीमती मंगलाताई पाटील अध्यक्ष महिला आघाडी, गोपाळ पाटील संचालक, शिवराज पाटील संचालक, किरण देवराज संचालक, विजय पाटील संचालक,
श्रीमती कल्पनाताई पाटील संचालक, रावसाहेब पाटील संचालक, कैलास बाविस्कर, गणेश पाटील सरपंच मालखेडा, कुणाल पाटील, दिव्यांक सावंत, दीपक चौधरी, नंदू गवळी, हरीश पवार उपस्थित होते.
तसेच चोपडा तालुक्याचे पुरवठा विभागाचे योगेश नन्नवरे गोदाम व्यवस्थापक इतर महसूल कर्मचारी तसेच शिधा जिन्नस साठी पात्र असलेले लाभार्थी
सुद्धा मोठ्या प्रमाणात शासकीय विश्राम गृह चोपडा येथे उपस्थित होते. श्रीमती लताताई सोनवणे आमदार चोपडा यांच्या शुभहस्ते प्राथमिक स्वरूपामध्ये पाच लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आले.
याप्रसंगी चोपडा तालुक्यासाठी एकूण 42 हजार 770 एवढ्या आनंदाचा शिधा मंजूर असून सर्व आनंदाचा शिधा चोपड्याच्या शासकीय गोदामात प्राप्त झालेले असून
उद्यापासून चोपडा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना वितरणाचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी शासनाचा या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
असे आवाहन आ.सौ.लताताई सोनवणे तसेच विकास पुरुष माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे ही वाचा👇
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम