आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विरूध्द फेक नरेटिव — प्रकाश क्षीरसागर मु.पो.खर्डी ता. चोपडा
फेक नरेटिवच्या विरोधातील विजय: प्रा. सोनवणे यांचे विकास मूल्यांकन
आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विरूध्द फेक नरेटिव
— प्रकाश क्षीरसागर मु.पो.खर्डी ता. चोपडा
फेक नरेटिवच्या विरोधातील विजय: प्रा. सोनवणे यांचे विकास मूल्यांकन
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली चोपडा तालुक्यातील विकासकामे आणि त्यांच्या लोकसंपर्कामुळे जनतेचा विश्वास वृद्धिंगत झाला. शैक्षणिक, आरोग्य, कृषी आणि पारदर्शी प्रशासनाच्या आधारे त्यांनी विरोधकांच्या फेक नरेटिवचा चक्रव्यूह भेदला. यामुळे त्यांनी केवळ राजकीय विजय मिळवला नाही तर जनतेच्या विश्वासाचाही महत्त्वाचा किल्ला जिंकला.
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाला. महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. अर्थातच लोकशाहीत लोकशाही पध्दतीने निवडणुका घेवून लोकांकडूनच महायुतीचा विजय आणि लोकांकडूनच महाविकास आघाडीचा पराभव झाला.
कारण लोकशाहीत जनतेचा हातातच जय-पराजयाची दोरी असते. विजयाचा आनंद साजरा केला जातो तर पराभवात आत्मचिंतन केले जाते. पण महाराष्ट्रात सध्या आत्मचिंतन न करता आत्मक्लेश सुरू आहे.
“जनतेने आम्हाला का स्विकारलं नाही याचे आम्ही आत्मचिंतन करू व पुढे जोमाने जनतेची सेवा करू” अशी उदात्त राजकीय भावना महाराष्ट्रातून विलुप्त होताना दिसत आहे. महायुतीला एवढे यश आणि महाविकास आघाडीला एवढे अपयश का आले ? हा पत्रकारिता क्षेत्रातील राजकीय विश्लेषकांसाठी महिनाभराची चर्चा राहिलच.
पण यासोबत राजकीय विश्लेषकांपाठोपाठ संपूर्ण खान्देशसाठी चर्चेचा विषय ठरला तो चोपडा विधानसभा निवडणुक. राज्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांसाठी चोपडा विधानसभेचा अंदाज लावणे तारेवरची कसरत ठरत होती.
याचे कारणही तसे स्पष्टच होते. कारण आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वात माजी आमदार लताताई
सोनवणे यांनी केलेली विकासकामे होती तर दुसरीकडे तालुक्याचे तीन-तीन माजी आमदार अाणि इतर दिग्गज होते.
निवडणुक अगदी जवळ येवून ठेपली असताना भाजपाचे पदाधिकाऱ्यांमध्येही संभ्रामावस्था होती. यावेळी भाजपचे पदाधिकारीही महाविकास आघाडीला छुपी मदत करतील अशीही चर्चा मध्यंतरी तालुक्यात सर्वासामान्यांमध्ये रंगली होती.
त्यामुळे चोपडा विधान सेभेचे राजकीय निकष लावणे राजकीय तज्ञांना कठीण होते. कारण सुरूवातीला राष्ट्रवादी अजीत दादा पवार गटाचे घनश्याम अग्रवाल आणि रिपाईचे पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त तालुक्यातील महायुतीचा कोणताच चेहरा प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या सोबत दिसून येत नव्हता.
लोकसभा निवडणुकीनंतर ‘फेक नरेटिव’ या संकल्पनाचा शोध लागला. या फेक नरेटिवचा प्रयोग मोठ्या प्रमाणात या चोपडा विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाला. शिवसेनेचे उमेदवार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याविरूध्द भली मोठी ‘फेक नरेटिव’ टीम कार्यरत होताना दिसत होती.
प्रा. चंद्रकांत सोनवणे व मा.आ.लताताई सोनवणे यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामांवर पडदा टाकण्यासाठी ही टीम कार्यरत होती. पण सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि प्रा.चंद्रकांत सोनवणे व लताताई सोनवणे यांनी तालुक्यात केलेल्या विकासाने ‘फेक’ नरेटिवला ‘फेल’ नरेटिव करून विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला.
राजकारण असो की सामाजिक जीवन जर का एखाद्या व्यक्तीचा वर्चस्वाला सरळ-सरळ आव्हान देता येत नसेल तर त्या व्यक्तीविरूद्ध बनावट चर्चेचा षडयंत्रातून समोरचा व्यक्तीचा वर्चस्वाला आव्हान देवून खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो.
चोपडा विधानसभा निवडणुकीतही प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याविरोधात अशीच बनावट चर्चा म्हणजेच ‘फेक नरेटिवचे’ चक्रव्यूह तयार करण्यात आले होते. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याविरोधात चक्रव्यूह तयार करून सांगण्यात आले की, प्रा.सोनवणे दादागिरी करतात, कधी सांगण्यात आले की,
धानोऱ्याचे सब्सस्टेशन येवू दिले नाही, कधी सांगण्यात आले की, ना.गुलाबराव पाटील व प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे एकमेकांशी कधी पटत नाही, कधी सांगण्यात आले की, गुलाबराव पाटलांसोबत कोळी समाज नाही तर चोपड्यात प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्यासोबत गुजर समाज नाही.
विरोधकांकडून संभ्रमच-संभ्रम…
म्हणजेच फेक नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न अगदी पोटतिडकीने प्रयत्न करण्यात आले. असं वाटत होतं ही निवडणुक प्रा.चंद्रकांत सोनवणे विरुद्ध ‘फेक नरेटिव’ अशीच आहे.
पण आता काळानुसार राजकारण बदलले लोकांची राजकीय जाणिव व समजमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य आणि अयोग्याची ओळख जनतेला लवकर कळते. आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विरूध्द जी फेक नरेटिव पसरविण्यात येत होती. त्याच्या तथ्यांसोबत कुठेही मेळ बसत नव्हता.
यामुळे चोपड्याच्या जनतेचा प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्यावरील विश्वास अधिकच वाढत गेला. मागील दहा वर्षांतील विकास कामांमधून चोपडा तालुक्यात जो बदल झाला त्या विकासापुढे विरोधकांचा फेक नरेटिव मागे पडत गेला.
मागील दहा वर्षात कार्यकर्ता आणि जनतेचा सुख दुःखात प्रा.चंद्रकांत सोनवणे सहभागी होत गेले, यामुळे फेक नरेटिव मागे पडत गेला. यासोबत मागील दहा वर्षात सामान्य लोकांची शासकीय कामे जलद गतीने होवू लागली.
शिक्षण आणि आरोग्य यात आमुलाग्र बदल झाला. यामुळेही फेक नरेटिव मागे पडत गेला. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वात चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा पारदर्शक कारभारामुळे फेक नरेटिवचा या चक्रव्यूवला भेदण्यात प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना यश आले.
लोकसभा निवडणुकीचा वेळेला ‘संविधान खतरे मे है’ हा आणि यासारखे अनेक फेक नरेटिवचा प्रयोग करून जनतेमध्ये गेले होते. आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही आले.
अगदी तशाच प्रकारचा फेक नरेटिवचा प्रयोग चोपडा विधानसभा निवडणुकीचा वेळेला प्रा.चंद्रकात सोनवणे यांच्या विरोधात करण्यात आला, पण प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी ‘My pain is my destiny ‘ म्हणत अखेर फेक नरेटिवचा या प्रयोगाला हरवत विजय मिळवला.
हे हि वाचा👇
माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते 67 प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम