आयएमएतर्फे बुधवारी अवयवदात्यांचा गौरव

बातमी शेअर करा...
आयएमएतर्फे बुधवारी अवयवदात्यांचा गौरव
      जळगाव –  येथील आयएमए जळगावतर्फे बुधवार १३ रोजी दुपारी ३ वाजता व.वा. वाचनालयाजवळील आयएमए हॉल येथे जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयवदात्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
       या कार्यक्रमात सर्व धर्माचे धर्मगुरू एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून अवयवदानाच्या पवित्र कार्यामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते याबद्दलचे महत्त्व सांगणार आहेत.
          अवयवदानाबद्दल जनजागृती व्हावी, सर्वसामान्य नागरिकांना यातून प्रेरणा मिळावी, समाजाला नवी दिशा मिळावी म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, सचिव डॉ. भरत बोरोले यांनी दिली.
     सर्व नागरिकांसाठी हा कार्यक्रम
विनामूल्य व प्रवेश खुला आहे. मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आयएमए तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम