आयएमए आणि जीडीओए यांच्यातर्फे हाड, सांधेदुखी याविषयी मार्गदर्शन 

बातमी शेअर करा...
आयएमए आणि जीडीओए यांच्यातर्फे हाड, सांधेदुखी याविषयी मार्गदर्शन 
          जळगाव – येथील आयएमए आणि जळगाव जिल्हा आर्थोपेडिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी उद्यानात हाड व सांधेदुखी यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.
        कार्यक्रमास आयएमएचे सचिव डॉ.भरत बोरोले, आर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, सचिव डॉ. संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, अस्थिरोग तज्ञ डॉ. अनिल खडके व डॉ. ज्ञानेश पाटील यांनी वाढत्या वयातील सांधेदुखी, हाडांचा ठिसूळपणा याविषयी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करीत हाडे मजबूत तर शरीर सक्षम  या संकल्पनेचे महत्त्व समजावून सांगितले.
        याप्रसंगी डॉ.एन एम शिरसाठ, डॉ.दीपक अग्रवाल, डॉ.मिलिंद कोल्हे, डॉ.अरुण पाटील, डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.आर.एच. अग्रवाल, डॉ.नितीन धांडे, डॉ.योगेंद्र नेहेते, डॉ.मनीष चौधरी, डॉ. अनुज पाटील, डॉ. अजय सोनवणे, डॉ. तेजस पाटील, डॉ. शौनक पाटील, डॉ. सचिन खर्चे या मान्यवरांसह उद्यानातील ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम