
आयएमए जळगाव आयोजित सायक्लोथॉन उत्साहात
आयएमए जळगाव आयोजित सायक्लोथॉन उत्साहात
जळगाव: डॉक्टर्स डे २०२५ निमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) जळगाव शाखेने नुकतेच सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन केले.
पेडल फॉर पर्पज, राईड विथ प्राईड या घोषवाक्यासह आयोजित या सायक्लोथॉनमध्ये शहरातील सर्वच ब्रांचच्या डॉक्टरांनी सहभाग घेत आरोग्य, एकता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला.
सकाळी ६:३० वाजता काव्यरत्नावली चौकातून सायक्लोथॉनला सुरुवात झाली. काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा चौक मार्गे पुन्हा काव्यरत्नावली चौकात येऊन सायक्लोथॉनची सांगता झाली.
या कार्यक्रमात आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे आणि सचिव डॉ. भरत बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक डॉक्टर्स आणि सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या सायक्लोथॉनमध्ये डॉ. धीरज चौधरी, डॉ. अजय शास्त्री, डॉ. सुशीलकुमार राणे, डॉ. अनघा चोपडे, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. हेमंत पाटील, डॉ. विवेक पाटील, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सचिन देशमुख, डॉ. सुरवसे, डॉ. दीपक जाधव, डॉ. अमित भंगाळे, डॉ. धवल खडके आणि प्रिया झंवर यांचा समावेश होता.
यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनघा चोपडे यांनी विशेष प्रयत्न केले. आयएमए जळगाव टीमच्या आरोग्याला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमांमुळे समाजात आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत होते, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम