
आयुर्वेदला राजाश्रय मिळाल्यामुळे डॉक्टरांमध्ये आत्मविश्वास वाढला – अधिष्ठाता डॉ. अवघडे
आयुर्वेदला राजाश्रय मिळाल्यामुळे डॉक्टरांमध्ये आत्मविश्वास वाढला – अधिष्ठाता डॉ. अवघडे
रोटरी क्लब ऑफ जळगांव गोल्डसिटी व डॉक्टर वडोदकर मेडिकल फाउंडेशन यांचा उपक्रम
जळगाव – आयुर्वेदाला राजाश्रय मिळाल्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांमध्ये आत्मविश्वास वाढला असे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.आगतराव अवघडे यांनी प्रतिपादन केले.
रोटरी क्लब ऑफ जळगांव गोल्डसिटी व डॉक्टर वडोदकर मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही घेण्यात आलेल्या काविळ रोगनिदान व चिकित्सा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
महाबळ स्टॉपजवळील मीरा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र येथे आयोजित या शिबिरा प्रसंगी शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुभाषचंद्र मडावी, सहप्रांतपाल सचिन जेठवाणी, रोटरी गोल्डसिटीचे अध्यक्ष डॉ. नीरज अग्रवाल, सचिव स्वप्निल पलोड, डॉक्टर वडोदकर मेडिकल फाउंडेशनचे डॉ.सुभाष वडोदकर, प्रकल्प प्रमुख प्रकाश पटेल, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ सूर्यकिरण वाघण्णा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जेव्हापासून आयुर्वेदाला राजाश्रय मिळाला तेव्हापासून सर्व आयुर्वेदिक डॉक्टर धैर्याने आणि प्रभावी पद्धतीने रोगचिकित्सा करीत आहेत असे त्यांनी सांगितले.
शासकीय होमियोपॅथिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मडावी यांनी रोटरी जळगाव गोल्डसिटी आणि वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पाड्यावर वैद्यकीय शिबिराद्वारे रुग्णसेवा पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला.
प्रारंभी धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलित करण्यात आले. हे शिबिर संपूर्ण महिनाभर चालणार असून डॉ.
सुभाष व डॉ. प्रणिता वडोदकर रुग्णांची मोफत तपासणी उपचार करणार आहेत. तरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा
असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमास रोटरी गोल्डसिटीचे निलेश जैन, राहुल कोठारी, तुषार जाखेटे, अशोक जैन, उमंग मेहता, प्रखर मेहता, विनय बन्सल, प्रशांत कोठारी यांची विशेष उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम