आरटीओ अधिकाऱ्यांना धमकावून जप्त केलेले वाहन पळविले

तिघांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

आरटीओ अधिकाऱ्यांना धमकावून जप्त केलेले वाहन पळविले

तिघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी

प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) अधिकाऱ्यांना दमबाजी करत, जप्त केलेले वाहन पळविण्याचा धक्कादायक प्रकार जळगाव येथे घडला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

महसूल उशीरा भरल्यामुळे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याने आरटीओ विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली होती. यात वाहतूक निरीक्षक नितीन स्वप्निल दाभाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एक अवजड (ओव्हरलोडेड) वाहन जप्त केले. या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात अतिभार असल्याचे आढळून आले, त्यामुळे नियमानुसार वाहन जप्त करून RTO कार्यालयात आणण्यात आले.

RTO कार्यालयातून जबरदस्तीने वाहन पळविले

सदर वाहन RTO कार्यालयाच्या परिसरात उभे असताना, राजी पाटील, पृथ्वीराज पाटील आणि स्वराज पाटील या तिघांनी घटनास्थळी येऊन अधिकाऱ्यांशी वाद
घालण्यास सुरुवात केली.यावेळी आम्हाला कोणीही अडवू शकत नाही” अशा धमक्या त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर चालकाला जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांनी वाहन पळवले.

तिघांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकारामुळे RTO अधिकाऱ्यांनी तात्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार राजीव पाटील, पृथ्वीराज पाटील आणि स्वराज पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. पुढील काही तासांत अटक होण्याची शक्यता आहे.

RTO अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, “वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा धमक्या किंवा जबरदस्तीला कुठलीही गय दिली जाणार नाही.”या घटनेमुळे RTO आणि वाहतूक विभागाच्या कारवाईची दहशत निर्माण होण्याऐवजी नियम तोडणाऱ्यांना आता अधिक कडक पद्धतीने सामोरे जावे लागणार आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम