
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन संस्थेला यंदाचा राष्ट्रपिता म. गांधी आरोग्य सेवा पुरस्कार जाहीर
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन संस्थेला यंदाचा राष्ट्रपिता म. गांधी आरोग्य सेवा पुरस्कार जाहीर
जळगाव प्रतिनिधी I सरकारी रुग्णालयात गरिबांचे होणारे हाल मी पाहिलेले आहेत, त्यांची होणारी दयनीय अवस्था नेहमीच व्यथित करणारी होती, पैसे नसल्याने त्याच शासकीय रुग्णालयात अंथरुणाला खिळलेली माणसं पाहतांना वेदना होतं या रुग्णांना अतिशय चांगल्या रुग्णालयात उपचार मिळाले पाहिजेत ही लोक बरी होऊन आनंदाने जीवन जगली पाहिजेत असे वाटे म्हणुनच मी आरोग्यसेवेची कास धरली आणि पुरस्कार जाहीर झाल्याने आपले शुभ आशीर्वाद मला लाभणार आहेत असे मत आरोग्यम् धमसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केले.
श्री भराडी पब्लिकेशन, हॅपी हार्ट फाऊंडेशन ठाणे आणि करडे स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीचा राष्ट्रपिता म. गांधी आरोग्य सेवा पुरस्कार प्रसिद्ध गायक व बिग बॉस कलाकार संतोष चौधरी (दादुस) यांच्या हस्ते जितेंद्र पाटील यांना 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 : 30 वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, जि. प. समोर ठाणे ( प ) या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.
अविरतपणे सुरु असलेली त्यांची आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्याची संस्थेने दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे ग्लोबल सोशल एक्सलन्ट कॉन्फरन्स समितीच्या अध्यक्षांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
जितेंद्र पाटलांच्या अनेक आरोग्यविषयक आणि सामाजिक कार्यात मोफत तपासणी व उपचार शिबीरे राबविणे, रुग्णांच्या विविध रुग्णालयात मोफत शास्त्रक्रिया करून देणे, कोरोना काळात गरिबांना मोफत अन्नदान करणे, कोरोना झालेल्या रुग्णांना योग्य ते उपचार मिळवुन देणे, अनाथ आश्रमामध्ये वह्या पुस्तके व कपड्यांचे वाटप करणे ई. उल्लेखनिय कार्य केलेली आहेत आणि यांचमुळे योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळणार असल्याचे समाधान मिळते आहे व आनंद होतो आहे असे मत निवड समितीकडुन व्यक्त करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम