
आरोग्य विद्यापीठात क्रातिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी
आरोग्य विद्यापीठात क्रातिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी
नाशिक : – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात क्रांंतसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी क्रांंतसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी क्रांंतसिंह नाना पाटील यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी श्री. हेमंत गायकवाड, श्री. विनायक ढोले, श्री. पुष्कर त`हाळ, श्री. दिलीप राजपूत, श्री. पंढरीनाथ कोल्हे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम