
आरोग्य विभागातील १३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
आरोग्य विभागातील १३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागातील विविध संवर्गातील १३ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाद्वारे पदोन्नती देण्यात आली. शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्वतः उपस्थित राहून पदोन्नतीसाठी समुपदेशन घेऊन सर्वांना पदस्थापना दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागातील पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या विषयाची दखल घेत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यानंतर पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला.
या पदोन्नती प्रक्रियेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी डी. एस. पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी माधवी शिंदे, तसेच कांतीलाल पाटील व मनोज पाटील यांनी परिश्रम घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या पदोन्नतीमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यक्षमतेने व अधिक उत्साहाने काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम