आर्वे येथे किरकोळ वादातून तलवार सदृश हत्याराने हल्ला; तरुण गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

आर्वे येथे किरकोळ वादातून तलवार सदृश हत्याराने हल्ला; तरुण गंभीर जखमी
पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल; आरोपीविरुद्ध कारवाई सुरू

पाचोरा – प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील आर्वे गावात किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन एका २५ वर्षीय तरुणावर तलवार सदृश हत्याराने हल्ला करण्यात आला. या घटनेत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून, आरोपीविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकीर हैदर तडवी (वय २५) हा आपल्या मित्र समीर तडवीसह दिनांक १४ जून रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास गावातील मराठी शाळेच्या पाठीमागील रस्त्याने जात होता. याचवेळी त्याठिकाणी आलेल्या सुरेश रामकृष्ण पाटील (रा. आर्वे) याने शाकीर यास उद्देशून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शाकीरने कारण विचारले असता, आरोपी सुरेश पाटील याने घरी जाऊन तलवार सदृश धारदार हत्यार आणले आणि शाकीर याच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात शाकीर तडवी याच्या हाताला गंभीर इजा झाली. या घटनेनंतर १६ जून रोजी शाकीर तडवी याच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश पाटील याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दिलीप वाघमोडे करत आहेत. गावात या घटनेमुळे खळबळ उडाली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम