आवाहन – भगव्याचे राज्य येण्यासाठी सज्ज व्हा ! – शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मी तुमच्या पाठीशी 1335 दिवस उभा राहिलो, आता तुम्ही मला 90 दिवस द्या अशी भावनिक साद घातली गुलाबरावांनी कार्यकर्त्यांना 

बातमी शेअर करा...

आवाहन – भगव्याचे राज्य येण्यासाठी सज्ज व्हा ! –
शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मी तुमच्या पाठीशी 1335 दिवस उभा राहिलो, आता तुम्ही मला 90 दिवस द्या अशी भावनिक साद घातली गुलाबरावांनी कार्यकर्त्यांना 

आगामी निवडणुकीत नियोजन करून मिशन मोडवर काम करा – शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे निर्देश

जळगाव l प्रतिनिधी

राज्यात महायुतीचे सरकार जोमाने काम करीत असून पाच वर्षात मी तुमच्यासोबत 1335 दिवस मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. आता तुमचे 90 दिवस माझ्यासाठी द्या अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घालत आवाहन केले.

विधानसभा निवडणुकीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवलंबून असल्याने आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगव्याचे राज्य येण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

आवाहन
आव्हान

तर गावपातळी पासून ते तालुका पातळीवरील सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटना वाढीसाठी कार्यरत राहावे. विकासासाठी सदैव झटणाऱ्या व कार्यकर्त्यांना जीवाला जीव देणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सदैव पाठीशी राहून जळगाव ग्रामीण मधून जास्तीत जास्त लिड देण्याचा संकल्प करून गाफील न राहता कामाला लागा.

शाखाप्रमुख, सरपंचांनी, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय बैठका घेऊन सुक्ष्म नियोजन करून आगामी सर्व निवडणुकांमध्ये नियोजनबद्ध पध्दतीने मिशन मोडवर राहून काम करून विजयाची मुहूर्तमेढ रोवा असे आवाहन शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी केले.

धरणगाव व जळगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाचा शिवसेनेचा मेळावा आज अजिंठा विश्राम गृहात पार पडला यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी केले. तर आभार तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी मानले. जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिता ताई कोल्हे – माळी,

तालुका प्रमुख डी.ओ. शिवराज पाटील, यांनी शिवसेना संघटना बांधणी, व शिवसेना सदस्य नोदणी, बूथ प्रमुख बाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी धरणगाव व जळगाव तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिता ताई कोल्हे – माळी जि. प. सदस्य पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख

अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, पी. एम. पाटील सर, तालुका प्रमुख डी.ओ. शिवराज पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, पप्पू भावे, युवासेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर काटोले, अजय महाजन, आबा माळी, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर,

तालुका पदाधिकारी जितू पाटील, प्रमोद सोनवणे, संदीप सुरळकर, प्रवीण परदेशी संजय घुगे, डॉ. कमलाकर पाटील, दूध संघाचे रमेश आप्पा पाटील, मार्केटचे माजी सभापती कैलास चौधरी, प्रमोद सोनवणे, राजू पाटील, साहेबराव वराडे, महेश चौधरी,

गोपाल जिभाऊ पाटील, महिला आघाडीच्या पदाधिकारी शोभाताई चौधरी, ज्योतीताई चव्हाण, पुष्पाताई पाटील, यांच्या सह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच सदस्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे हि वाचा👇

सावदा येथे अग्निशमन दलाच्या रॅपीड बुलेटचे लोकार्पण

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम