आविष्कार – रामायण आधारित नाटके रामकथेचा सृजनात्मक आविष्कार – मंगला दिदी
रोटरी उत्सव कार्यक्रमात ओम शांती केंद्राच्या मंगला दिदिंचे प्रतिपादन
चोपडा – नाटक’ हे संस्कृत साहित्याचे एक अविभाज्य अंग. विविधांगी विषयांवर आधारित संस्कृत नाटके असताना रामायण कथा त्यापासून कशी अलिप्त राहील? रामकथेचा सृजनात्मक आविष्कार संस्कृत नाटकांमध्ये दिसतो.
त्यात प्रामुख्याने ‘प्रतिमा’, ‘अभिषेक’, ‘उत्तररामचरित’ आणि ‘महावीरचरित’ या नाटकांचा उल्लेख आहे. असे प्रतिपादन चोपडा ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दिदी यांनी रोटरी उत्सव कार्यक्रम प्रसंगी केले.
२२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होत आहे. त्या धर्तीवर आधारीत व श्री रामाच्या जीवनावर आधारित नाटिका चोपडा येथील ओम शांती केंद्रामार्फत दि.१९ जानेवारी ते २२ जानेवारी रोटरी उत्सवात नाटिका हुबेहूब सादरीकरण प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हिडिओ पाहा👇
https://fb.watch/pNzfVzBz8K/?mibextid=Nif5oz
सदर नाटिका पाहताना प्रेक्षक मंत्रमुग्ध तर होतोच सोबत टाळ्यांची दाद देत कलाकारांचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही. सदर नाटिकेत श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान नारद व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पात्रे लक्ष वेधून घेतात.
श्रीराम चंद्र प्रभूंचा संदेश व त्यांचे कार्य, त्यांचा आदर्श याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन अश्विनी दीदी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओम शांती केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारीज मंगला दीदी, राज दीदी, सारिका दीदी, कांचन भोळे, राजेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.
हे ही वाचा👇
चोपडा महाविद्यालयास कबचौ उमवि एकांकिका करंडक स्पर्धेत हॅट्रिक प्राप्त विजेत्यांचा झाला सत्कार
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम