आविष्कार २०२५ स्पर्धेचे उदघाटन

बातमी शेअर करा...

आविष्कार २०२५ स्पर्धेचे उदघाटन

स्पर्धेत ४१८ संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित विद्यापीठ प्रशाळांसाठी पहिल्या टप्यातील आविष्कार २०२५ स्पर्धेचे उदघाटन झाले. या स्पर्धेत ४१८ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून २५३ पोस्टर्स आणि १९ मॉडेलच्या माध्यमातून सादरीकरण केले.

विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात आविष्कार २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन दालमील असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा, अस्टेमो इंडिया प्रा. लि. कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर योगेश हेंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोगरे, व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. जयदिप साळी, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, डॉ. कांचन महाजन, विद्यार्थी विकासचे संचालक जयेंद्र लेकुरवाळे, नवसंशोधन व नवउपक्रम साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, आविष्कारचे समन्वयक डॉ. नवीन दंदी, डॉ. संदिप भामरे, डॉ. अमरदीप पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रेम कोगटा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आविष्कार सारख्या उपक्रमांमधून नाविण्यपूर्ण संकल्पनांचा विचार करुन या संकल्पना कृतीत आणायला पाहिजेत. नाविण्यपूर्ण कल्पनांचा उत्सव म्हणजे आविष्कार सांगतांना त्यांनी विविध लोकाभिमुख शोधांचा आढावा घेतला. योगेश हेंबाळकर यांनी आपल्या मनोगतात आविष्कारच्या माध्यमातून नवनविन शोध लागतील आणि हे संशोधन समाजाला निश्चितपणे उपयुक्त ठरेल या उपक्रमातूनच देशाची घोडदौड सुरु आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवनवीन वाटा शोधाव्यात असे आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगतात विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी म्हणाले की, समाजाला, देशाला प्रगती करावयाची असेल तर टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि इनोवेशन या तीन गोष्टी लागणार आहेत. या असेल तर नक्कीच प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला. आविष्कार स्पर्धा विद्यार्थी संशोधकासाठी ही संधी आहे, आविष्कारच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले आहे, त्यामुळे योग्य पद्धतीने त्याचा उपयोग केल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या करीयरसाठी फायदा होईल असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. प्रास्तविक समन्वयक डॉ. नवीन दंदी यांनी केले, परिचय डॉ. संदिप भामरे, डॉ. अमरदीप पाटील यांनी करुन दिला. सूत्रसंचलन डॉ. प्रिती सोनी, डॉ. विजय घोरपडे तर आभार डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मानले.

विद्यापीठ प्रशाळांसाठी पहिल्या टप्यातील आविष्कार २०२५ स्पर्धेत विज्ञान, औषध निर्माण, कृषी, कला व वाणिज्य, अभियांत्रिकी, वाणिज्य व व्यवस्थापन या शाखांमध्ये ४१८ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून २५३ पोस्टर्स आणि १९ मॉडेलच्या माध्यमातून सादरीकरण केले.

मॉड्यूल्स : Speak to your data एजेंटिक इंटेलिजन्स विथ कनेक्टेड नॉलेज रिटेल, स्मार्ट ड्रेनेज IoT आधारित मॉनिटरिंग सिस्टीम, पारदर्शक वृत्तपत्र वाचन स्टँड, आदिवासी धान्य संजीवनी मॉड्यूल, आदिवासी भागातील प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा अध्ययनासाठी ‘कषी’ कार्यक्रमाचे विकसन आणि त्याचा परिणामकारक अभ्यास, प्राथमिक स्तरावरील पर्यावरण-अभ्यास विषयासाठी प्रतिक्रिया-निर्मिती (Reinforcement Activities) आणि त्यांचा परिणामकारक अभ्यास, शेतीमध्ये जंगली जनावरांना पळविण्यासाठी टॉर्च, स्मार्ट अ‍ॅग्रो–कृषी IoT आधारित प्रिसिजन सिंचन आणि प्राणी संरक्षण प्रणाली, सॅटेलाइट API आधारित मॉनिटरिंग सिस्टीम, वर्टिकल फार्मिंग, विमा पॉलिसीचे लाभ, पर्यावरणपूरक सिमेंट, जावा भाषेवर आधारित विद्यार्थी नोंदणी प्रणाली, सोलर टाइमर, मफल फर्नेस टाइमर, स्पिन कोटर युनिट, पोस्टर्स : स्मार्ट वाहन नंबर प्लेट QR कोड,,मोबाईल किरणोत्सर्ग, बंजारा संस्कृती, बायो–केमिकल ड्रग्स व डेटा कंप्यूटिंग, हर्बल डिटॉक्स, पाणी व्यवस्थापन, ई-कॉमर्स आणि ब्रँडिंग, स्मार्ट फार्मिंग, छोट्या शेतांचे मॉडेल, प्लांट बेस्ड मीट, पेपर वेस्ट, मीयावाकी जंगल (Miyawaki Forest), भारतातील संकट व्यवस्थापन, भिक्षावृत्ती कमी करण्यासाठी उपाययोजना, गणित अध्ययन, मोबाईल फोन व्यसनाधीनता, महिलांवरील हिंसाचार आणि माध्यमांची भूमिका, सोशल मीडियाचा युवकांवर होणारा प्रभाव आणि माध्यमांची भूमिका, चिल्ड्रन ड्रोन कंट्रोल, सतत टिकावू (Sustainable) समज, विचार आणि उत्तरदायी कृती यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम