
आव्हाणे येथे ५ मेपासून मोफत वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन
महंत डॉ. सुशीलजी महाराज विटनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कारांचे बीजारोपण
आव्हाणे येथे ५ मेपासून मोफत वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन
महंत डॉ. सुशीलजी महाराज विटनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कारांचे बीजारोपण
जळगाव | प्रतिनिधी
आव्हाणे (ता. जि. जळगाव) येथे दिनांक ५ मे ते १४ मे दरम्यान सद्गुरू संत तानाजी महाराज प्रसादिक भव्य मोफत वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे हे सलग चौथे वर्ष असून, यावर्षीही महंत प्रा. हभप डॉ. सुशीलजी महाराज विटनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात येणार आहे.
उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक जागृती, सुसंस्कार आणि वारकरी संप्रदायाच्या मूल्यांचा प्रसार व्हावा, या पवित्र उद्देशाने हे शिबिर दरवर्षी नव्या गावांमध्ये फिरत्या नारळाच्या पद्धतीने आयोजित केले जाते. विशेष म्हणजे २०२९ पर्यंत या फिरत्या बालसंस्कार शिबिराचे आयोजन निश्चित करण्यात आले आहे.
यावर्षीचे शिबिर आयोजक :
कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर
श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर संस्थान
समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, आव्हाणे
शिबिराचे दैनिक कार्यक्रम :
५.३० वा. – योगासन, प्राणायाम, काकड आरती
७.३० ते ८.३० वा. – नित्यपाठ, गीता अध्याय, नमनवाटिका, टाळ-पखवाज बोल
८.३० ते १०.३० वा. – हरिकीर्तन
११.०० वा. – मधुकरी पद्धतीने भोजन
१२.०० ते २.०० वा. – विश्रांती
२.०० ते ४.०० वा. – अध्याय, प्रवचन
४.३० ते ६.०० वा. – हरिपाठ, मैदानी खेळ, रिंगणसोहळा
६.३० वा. – रात्रीचे मधुकरी भोजन
८.०० ते ११.०० वा. – श्रीदेवी भागवत कथा
शिबिराची सांगता :
दि. १५ मे रोजी सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत महंत प्रा. हभप डॉ. सुशीलजी महाराज विटनेरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व पारंपरिक गुलालाच्या रिंगणसोहळ्याने शिबिराची सांगता होणार आहे.
या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्मिक मूल्ये, सेवा-परमार्थाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांचा सहभाग निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम