आव्हाने येथील लक्ष्मी जिनिंगमधून २ लाखांची चोरी

बातमी शेअर करा...

आव्हाने येथील लक्ष्मी जिनिंगमधून २ लाखांची चोरी

 

जळगाव: जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारातील लक्ष्मी जिनिंगमधून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी जिनिंगची भिंत फोडून आत प्रवेश करत तांब्याची तार, ऑइल आणि लोखंडी पट्ट्या लंपास केल्या आहेत. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १२ ते १३ ऑगस्टदरम्यान घडल्याचे समोर आले आहे. लक्ष्मी जिनिंगचे मालक अविनाश वसंत भालेराव (वय ५०, रा. आराधना अपार्टमेंट, आदर्श नगर, जळगाव) यांना १४ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम