आसोदा गोळीबार प्रकरणात निकाल; दोन आरोपी न्यायालयातून निर्दोष मुक्त

बातमी शेअर करा...

आसोदा गोळीबार प्रकरणात निकाल; दोन आरोपी न्यायालयातून निर्दोष मुक्त

आसोदा | प्रतिनिधी आसोदा येथील गाजलेल्या गोळीबार प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 89/2023 अन्वये दाखल करण्यात आलेल्या खटल्याचा निकाल अखेर न्यायालयाने दिला आहे. सदर प्रकरण सेशन केस नंबर 122/2023 अंतर्गत चालविण्यात येत होते.

या प्रकरणात भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कलम 307, 504, 506, 34, 75, तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 37 व 135 आणि आर्म्स अ‍ॅक्ट कलम 3/25 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले होते.

खटल्यादरम्यान सरकार पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या 10 साक्षीदारांच्या जबाबांची सखोल छाननी करण्यात आली. मात्र, साक्षी व पुरावे संशयाच्या पलीकडे दोष सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने आरोपी चेतन सुरेश आळंदे (उर्फ चिंग्या) व कैयुर कैलास पंधारे यांची निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. केतन ढाके यांनी प्रभावी व मुद्देसूद युक्तिवाद करत सरकार पक्षातील त्रुटी न्यायालयासमोर मांडल्या. तर सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. रमाकांत सोनवणे यांनी बाजू मांडली.

न्यायालयाच्या या निकालामुळे कायदेशीर प्रक्रियेतील पुराव्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम