आ. एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यातील चोरी नियोजनबद्ध

बातमी शेअर करा...

आ. एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यातील चोरी नियोजनबद्ध

भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्रे, सीडी आणि पेनड्राइव्हसुद्धा गायब

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील ‘मुक्ताई’ या बंगल्यात झालेल्या चोरीचा तपास अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. या चोरीत केवळ सोने व रोकडच नव्हे, तर गोपनीय कागदपत्रे, सीडी आणि पेनड्राइव्हसुद्धा चोरीला गेल्याचा गंभीर आरोप स्वतः खडसे यांनी केला आहे. “ही चोरी केवळ मुद्देमालासाठी नव्हे, तर नियोजनबद्धपणे करण्यात आलेली आहे. चोरी गेलेली कागदपत्रे एका गैरव्यवहाराशी संबंधित आहेत आणि त्यामुळे या चोरीचा उद्देश काय आहे, हे सर्वांना स्पष्ट होते,” असे खडसे यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत सहा लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला. खडसे यांनी सांगितले की, त्यांच्या बेडरूममध्ये काही भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्रे ठेवलेली होती. “माझ्या बेडरूममध्ये महत्त्वाची कागदपत्रे असल्याची माहिती कोणाला तरी होती. काही पेनड्राइव्हमध्ये गाणी होती, पण चोरी गेलेल्या सीडी वैयक्तिक आणि महत्त्वाच्या स्वरूपाच्या होत्या,” असे ते म्हणाले.

चोरट्यांनी जर केवळ चोरीच्या हेतूने बंगला फोडला असता, तर फक्त रोकड आणि दागिन्यांचीच चोरी झाली असती. मात्र, कागदपत्रे, सीडी आणि पेनड्राइव्ह चोरीला गेल्याने या घटनेमागील हेतूबाबत संशय निर्माण झाला आहे, असेही खडसे यांनी नमूद केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम