आ. किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा : विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

बातमी शेअर करा...

आ. किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा : विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
जळगाव / पाचोरा प्रतिनिधी

पाचोरा–भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांच्या परंपरेत आणखी एक उपयुक्त आणि ज्ञानवर्धक उपक्रम राबविण्यात येत आहे. किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था, पाचोरा आणि द युनिक अकॅडमी, जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा व भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व खुली भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आपले ज्ञान तपासण्याची व घडविण्याची ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

ही स्पर्धा दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता व्यापारी भवन, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर, पाचोरा येथे पार पडणार आहे. परीक्षेचे स्वरूप पूर्णतः प्रत्यक्ष (ऑफलाइन) असेल. उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी म्हणजेच सकाळी १० वाजेपर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा एका तासाची असेल आणि १०० प्रश्नांवर आधारित असेल. प्रश्नपत्रिकेत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश असेल. परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर पूर्णतः बंद राहील आणि फक्त पूर्वनोंदणी केलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल. पात्र उमेदवारांचे वय १८ ते ३४ वर्षांदरम्यान असावे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹११,०००/-, द्वितीयसाठी ₹७,१००/-, तृतीयसाठी ₹५,१००/-, चतुर्थसाठी ₹३,१००/- आणि पाचव्या क्रमांकासाठी ₹१,१००/- अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. हा उपक्रम पूर्णपणे मोफत असून निकाल व निर्णयासंदर्भात सर्व अधिकार आयोजकांकडे राखीव राहतील.

नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://forms.gle/V9iZm4MJ8mNSqMq97 या गुगल फॉर्मद्वारे आपले नाव नोंदवावे.

स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात येत असून, दि. ३ ते ७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान “UPSC-MPSC मोफत मार्गदर्शन शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत द युनिक अकॅडमी, जळगाव शाखा (राजस चेंबर, नूतन मराठा महाविद्यालयासमोर, जळगाव) येथे पार पडणार आहे.

या शिबिरासाठीही पूर्वनोंदणी आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी QR कोड स्कॅन करून ग्रुपमध्ये सहभागी व्हावे किंवा शिवसेना कार्यालय, शिवाजी चौक, पाचोरा येथे प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदवावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – ८९२९७२८४१८ / ९५०३३१३४४६ / ७९७२४५३९९३ किंवा www.theuniqueacademy.co.in.

कार्यक्रम स्थळी द युनिक अकॅडमीच्या प्रकाशित पुस्तकांवर ४० टक्के सवलत उपलब्ध राहणार असून, विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धक संधी मिळून त्यांच्या स्पर्धात्मक तयारीला चालना मिळणार असून, आ. किशोर आप्पा पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणखी एक उदाहरण समाजासमोर येणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम