
‘इंद्रधनुष्य २०२५’ युवक महोत्सवाच्या लोगोचे अनावरण; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रम संपन्न
‘इंद्रधनुष्य २०२५’ युवक महोत्सवाच्या लोगोचे अनावरण; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रम संपन्न
जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२५’ च्या लोगोचे अनावरण आज, मंगळवार दि. २८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते संपन्न झाले.
या अनावरण सोहळ्याला प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, विद्यापीठ परिषदेचे सदस्य नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. राम भावसार, प्रा. उज्वल पाटील आणि उपवित्तलेखाधिकारी एस. आर. गोहिल आदी मान्यवर उपस्थित होते.
या लोगोची संकल्पना राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची असून, त्यांच्या कल्पनेवर आधारित हा आकर्षक लोगो साकारण्यात आला आहे. इंद्रधनुष्य हा युवक महोत्सव राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती आणि सृजनशीलतेला व्यासपीठ देण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी आयोजित केला जातो.
राज्यपाल महोदयांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही कला व सांस्कृतिक स्पर्धा विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला नवे रंग आणि दिशा देणारी ठरत असून, यंदाचा ‘इंद्रधनुष्य २०२५’ महोत्सव अधिक भव्य आणि आकर्षक स्वरूपात पार पडणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम