इकरा एच. जे थीम महाविद्यालयात आकाश निरीक्षणाने आयोजन
राष्ट्रीय सेवा योजना एकक विशेष श्रमसंस्कार शिबीर
इकरा एच. जे थीम महाविद्यालयात आकाश निरीक्षणाने आयोजन
राष्ट्रीय सेवा योजना एकक विशेष श्रमसंस्कार शिबीर
जळगाव I प्रतिनिधी
येथील इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय जळगाव राष्ट्रीय सेवा योजना एकक विशेष श्रमसंस्कार शिबीरामध्ये भूगोल विषयांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ जानेवारी रोजी रात्री आकाश निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्राचार्य सतिश पाटील यांनी दुर्बिणीद्वारे आकाशातील चंद्र, गुरू, शुक्र, शनी , इतर ग्रह- तारे आणि आकाशगंगा संमधी सखोल माहिती व्याख्यान आणि प्रात्यक्षिकाद्वारे दिली.
आकाश निरीक्षणाचा आनंद भूगोल विषयांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, नशिराबाद येथील शाळेतील विद्यार्थी व रहिवाश्यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. तन्वीर खान यांनी केले. या कार्यक्रमामध्ये डॉ.इरफान शेख, डॉ.आमिन काझी, डॉ. राजु गवरे, डॉ.राजेश भामरे, डॉ.सदाशिव डापके , बाबा पटेल हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ शेख हाफिज यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भूगोल विषयांचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम