इकराच्या दानिश खान यांची आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेकरिता निवड

बातमी शेअर करा...

इकराच्या दानिश खान यांची आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेकरिता निवड

जळगाव प्रतिनिधी इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव येथील विद्यार्थी दानिश खान जावेद खान यांची “आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा” परुल गुजरात साठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या फुटबॉल संघामध्ये निवड करण्यात आली आहे. हा संघ दिनांक 3 जानेवारी ते 9 जानेवारी 2026 दरम्यान सहभागी होणार आहेत.
त्याच्या या निवडीबद्दल इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार, एजाज मलिक, अमीनबाई बादलीवाला, अब्दुल रशीद शेख, अब्दुल अजीज सालार,अब्दुल मजीद शेठ जकरिया, तसेच सर्व सदस्य यांनी दानिश खानचे अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉक्टर चांदखान यांचे दानिश खानला मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉक्टर वकार उपप्राचार्य डॉक्टर तनवीर खान, तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम