
इकरा थीम कॉलेज मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा
इकरा थीम कॉलेज मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा
जळगाव येथील इकरा थीम महाविद्यालयातील क्रीड़ा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे “राष्ट्रीय क्रीडा दिवस” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. चांद खान उपस्थित होते.
या निमित्ताने कॉलेज मध्ये विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या कार्यक्रमाला डॉ.शेख वकार व डॉ. आमिन काझी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी प्राचार्य डॉ चांद खान हे स्वतः हॉकी खेळाडू असल्याने त्यांनी ध्यानचंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.तन्वीर खान यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.शेख हाफिज यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे ८५ स्वयंसेवक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम