
इकरा थीम महाविद्यालय येथे “जागतिक आदिवासी दिन उत्साहात” साजरा
इकरा थीम महाविद्यालय येथे “जागतिक आदिवासी दिन उत्साहात” साजरा
मेहरूण (जळगाव) – इकरा एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरूण, जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) एककाच्या वतीने दिनांक ९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. चांद खान होते तर प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून प्रो. नफिसा तडवी उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात प्रो. तडवी यांनी आदिवासी समाजाची जीवनशैली, आहार-विहार, तसेच त्यांच्या शैक्षणिक समस्या यावर सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. तन्वीर खान यांनी केले, तर प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शेख हाफिज यांनी केले. प्रमुख उपस्थितींत प्रा. डॉ फिरदौस शेख, डॉ. शेख इरफान, डॉ. राजू गवरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कहकशा अंजुम यांचा समावेश होता. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अमिन काझी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम